आत्ता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे झाले अधिक सोपे, मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईन झाले सुरु

नमस्कार मित्रानो, CM Relief Fund Scheme देशात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. कोरोना काळात अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोरोनाच्या भीतीने अनेकांना लुटले देखील गेले. कोरोना काळात कोरोना काळात हॉस्पिटलमधील लाखों रुपयांची बिले पाहून डोळे पाढंरे होण्याची वेळ आली होती. कोरोना महामारीतून माणूस वाचावा, यासाठी अनेकांनी घरदार गहाण ठेवून किंवा कर्ज काढून रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर आरोग्य विमा काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, तरीही सर्वसामान्य माणूस अजूनही आरोग्य विमा योजनेपासून दूरच असल्याचे दिसते.

शासनामार्फत नागरिकांसाठी सतत निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी CM Relief Fund Scheme बद्दलची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.

CM Relief Fund Scheme : महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली याचे व्यवस्थापन केले जाते. मा. मुख्यमंत्री, या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहतात. यामध्ये फक्त तुम्हाला दिलेल्या नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल. ग्रामीण भागासह राज्याच्या इतर भागातून या मदतीतून मदत मिळो इच्छिणाऱ्या नागरिकांना या सुविधा द्वारे समस्या सोडविण्यात येणार आहेत.

 

मुख्यमंत्री सहायता निधी साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

मुख्यमंत्री सहायता निधी नेमकं काय आहे ?

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीअंतर्गत नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी रुग्णाच्या आजारानुसार ३ लाखापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता फंडामधून आर्थिक मदत केली जाते. पूर्वीची मर्यादा५० हजारावरून वाढवून आता ३ लाखापर्यंत करण्यात आली असून, यामध्ये विविध नवीन आजारांचा, शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीसाठी आर्थिक रक्कम दिली जाते. CM Relief Fund Scheme गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थी रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

येथे क्लिक करून दिलेल्या नंबर वर मिस कॉल द्या आणि योजनेचा लाभ घ्या

 

मुख्यमंत्री सहायता निधी Documents

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक/प्रमाणपत्र मूळ प्रत डॉक्टरांच्या सही शिक्यासह
  • अंदाजपत्रक खाजगी रुग्णालयाचे असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे आवश्यक
  • तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला ( १ लाख ६० हजार )
  • रुग्णाचा आधारकार्ड
  • रुग्णाचा राशनकार्ड
  • हॉस्पिटल बँक डिटेल्स
  • अपघात झाल्यास MLC/FIR कॉपी
  • संबंधित आजाराचे रिपोर्टस्

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची उद्दिष्टे

राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.

जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे. CM Relief Fund Scheme

दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

 

येथे क्लिक करून दिलेल्या नंबर वर मिस कॉल द्या आणि योजनेचा लाभ घ्या

Leave a Comment