नवीन मोटर सायकल घ्यायची आहे का? मिळणार फक्त 1 लाख रुपयांमध्ये मोटर बाईक, इथे बघा संपूर्ण माहिती

TVS Sport 

या बाईकमध्ये कंपनीने 109 cc पेट्रोल इंजिन दिले आहे, हे इंजिन 8.29 bhp ची कमाल पॉवर आणि 8.7 nM जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करते. या बाइकच्या इंजिनमध्ये 4 स्पीड ट्रान्समिशन सिस्टम आहे. ही बाईक किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. बाइकच्या किक स्टार्ट व्हेरिएंटची किंमत 64,050 रुपये आणि सेल्फ स्टार्ट व्हेरिएंटची किंमत 70,223 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

होंडा शाइन १२५

सणासुदीच्या काळात तुम्ही खरेदी करू शकता अशी पुढील बाइक Honda Shine 125 आहे. या बाइकमध्ये 123.9 cc इंजिन आहे, जे 10.59 bhp ची कमाल पॉवर आणि 11 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये 5 स्पीड ट्रान्समिशन आहे. ही बाईक 65 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 78,687 रुपये आहे.

होंडा CD110 ड्रीम

ही बाईक सरासरी ६५ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. या बाइकमध्ये 109.5 cc इंजिन आहे, जे 8.67 bhp ची कमाल पॉवर आणि 9.3 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 71,113 रुपये आहे.