कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी.! महागाई भत्त्यामध्ये झाली मोठी वाढ, सोबत सरकारने दिले बंपर बोनस शेतकऱ्यांना सुद्धा झाला मोठा फायदा

नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांचे दसऱ्या आधी दिवाळी होणार साजरी सरकारने दिले कर्मचाऱ्यांना खूप मोठे गिफ्ट मित्रांनो संपूर्ण लेख नक्की बघा सरकारने कशाप्रकारे कर्मचाऱ्यांना बोनस दिलेला आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सोबतही शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहेत तर संपूर्ण लेख सविस्तर बघा. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारचे कर्मचारी

आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली.

यामुळे महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होणार आहे. या निर्णयाचा फायदा ४८.६७ लाख कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. याचवेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बोनसही जाहीर केला आहे. रबी पिकांच्या हमी भावातही वाढ केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या वर्षी मार्च आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डीए आणि डीआरमध्ये प्रत्येकी चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

कधीपासून लागू ?

मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, वाढीव भत्ता १ जुलै २०२३ पासून लागू होईल. महागाई भत्त्यात ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित सूत्रानुसार आहे.

किती पडणार बोजा? महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी खजिन्यावर वार्षिक १२ हजार ८५७ कोटींचा भार पडणार आहे. महागाईचा सामना करण्यासाठी वर्षातून दोनदा डीए, डीआर दिला जातो.

 

👉 इथे क्लिक करून बघा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा 👈

Leave a Comment