रेशन धारकांसाठी मोठी माहिती.! आता नाव नोंदणी व नाव कमी करण्याची  प्रक्रिया होणार ऑनलाईन 

नमस्कार मित्रांनो आता सरकारने नवीन शिधापत्रिकांची छपाई बंद केल्याने गरिबांसाठी रेशनकार्ड इतिहास जमा होणार आहेत. नव्या प्रणालीनुसार आता रेशनकार्डऐवजी इलेक्ट्रॉनिक (ऑनलाइन) रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे. तसेच, नवीन नावांची नोंदणी किंवा वगळण्याची प्रक्रिया आता ई-रेशन कार्डद्वारे केली जाणार आहे.

अंत्योदय, अन्न सुरक्षा आणि किसान या तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे सरकार अन्नधान्य पुरवते. यासाठी लाभार्थ्यांना पिवळ्या, भगव्या अशा विविध रंगांच्या शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. .

 

 

👉हे सुद्धा वाचा : सरकारी नोकरीची मोठी संधी.! या सरकारी विभागात निघाली 669 पदांसाठी मोठी भरती, इथे करा लगेच अर्ज👈

 

 

विभक्त कुटुंबांमुळे शिधापत्रिकांची मागणी वाढल्याने शासन मागणीनुसार पुरवठा करत होते. मात्र, आता सर्व शासकीय कामे ऑनलाइन झाल्याने शासनाने रेशनकार्डांची छपाई बंद करून ई-रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन शिधापत्रिका दिली जाणार नसून, इलेक्ट्रॉनिक शिधापत्रिका दिली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. हे इलेक्ट्रॉनिक शिधापत्रिका मोफत मिळणार आहे.

पूर्वी शिधापत्रिका नसतील तर स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळत नसे. त्यामुळे रेशनकार्ड खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याला देण्यात आलेल्या धान्याची शिधापत्रिकेत नोंद करण्यात आली. साखर, तेल, गहू, तांदूळ स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध होते. आता साखर आणि तेल फक्त सणासुदीला मिळते. अनेक सरकारी योजनांसाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे. आजही अनेक नागरिक रेशनकार्ड मागण्यासाठी तहसील कार्यालयाच्या दारात गर्दी करतात. मात्र अद्याप शिधापत्रिका उपलब्ध झालेली नाही.

यासंदर्भात राज्य सरकारने आदेश काढून शिधापत्रिकांची छपाई आतापासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्याच्या लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिकांचे वाटप, शिधापत्रिकांमध्ये फेरफार आणि नावे वगळणे किंवा जोडणे ही कामे ऑनलाइन केली जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र शिधापत्रिका व्यवस्थापन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सरकारने शिधापत्रिकांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश जारी करण्यात आला असून आता फक्त मोफत ई-रेशन कार्ड उपलब्ध असेल. ज्या कुटुंबांना त्यांचे नाव बदलायचे आहे त्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे;

Leave a Comment