तुम्ही सुद्धा काढलेले आहे का विमा? तर आता या तारखेपासून होणार नियमांमध्ये बदल, मिळणार तुम्हाला अधिक फायदा

या पत्रानुसार, ‘पॉलिसीशी संबंधित दस्तऐवज क्लायंटला समजणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत, दस्तऐवज असा असावा की तो पॉलिसीशी संबंधित मूलभूत माहिती सोप्या शब्दात स्पष्ट करेल. शिवाय, त्यात सर्व माहिती असणे आवश्यक आहे. परिपत्रकानुसार, विमा कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यातील पॉलिसीशी संबंधित मुद्द्यांमधील फरकामुळे अनेक तक्रारी प्राप्त होतात. हे लक्षात घेऊन सीआयएसमध्ये बदल प्रकाशित करण्यात आले आहेत.

नवीन CIS मध्ये, कंपनीला विमा उत्पादन/ पॉलिसीचे नाव, पॉलिसी क्रमांक, विमा उत्पादन/ पॉलिसीचा प्रकार आणि विम्याची रक्कम याविषयी माहिती द्यावी लागेल. याशिवाय पॉलिसीधारकाला पॉलिसीमध्ये समाविष्ट खर्च, अपवर्जन, प्रतीक्षा कालावधी, कव्हरेजची आर्थिक मर्यादा, दावा प्रक्रिया आणि तक्रार निवारण यंत्रणा याबद्दल देखील माहिती दिली जाईल. परिपत्रकानुसार, विमा कंपनी, मध्यस्थ आणि एजंट यांना सुधारित CIC तपशील पॉलिसीधारकांना पाठवावे लागतील.