शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केली मोठी घोषणा.! राज्य सरकार देणार शेतकऱ्यांना आता हे लाभ

नमस्कार मित्रांनो सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांतीचा उपयोग करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकवर किसान क्रेडिट कार्डद्वारे बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली.

गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आमचे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे. आम्हाला अभिमान आहे की हे सरकार बळीराजाचे आहे. अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये आम्ही शेतकऱ्यांना मदत केली आहे. आपला देश प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून आम्ही सर्व योजना करत आहोत. गेल्या दीड वर्षात आम्ही शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. 120 सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. आपली नाळ शेती, माती आणि शेतकरी यांच्याशी जोडलेली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या रु 1, जलयुक्त शिवार पीक विमा आदी योजनांची माहिती दिली.

4 लाख 75 हजार शेतकऱ्यांची नोंदणी

यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड डिजिटल करण्याच्या जनसहयोग प्रकल्पासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्ह्याचाही समावेश होता. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, बीड जिल्ह्यातील महसूल, कृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसात 4 लाख 75 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे शेतकरी ओळखपत्र तयार केले आहे. यासाठी दोन अर्जही तयार करण्यात आले आहेत.

 

👉 हे ही बघा : रेशनधारकांसाठी आली खुशखबर.! गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिंदे सरकार देणार या वस्तू👈

Leave a Comment