शिंदे सरकारने विद्यार्थ्यांना दिली खुशखबर.! या विद्यार्थ्यांना शिंदे सरकार देणार वर्षाला 60 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जी आर्थिक मदत दिली जाते ती आता ओबीसी विद्यार्थ्यांनाही दिली जाणार आहे.

शहरांमध्ये राहणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठीच्या सध्याच्या योजनेचा लाभ उच्च शिक्षण घेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जाहीर केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि शहरात राहणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे.

उच्च शिक्षण घेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरू केली आहे. त्यामुळे आता एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनाही आधार योजनेचा लाभ मिळणार आहे.

सरकारी वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार योजनेंतर्गत सरकारकडून रोख मदत मिळत असे. मात्र आता सरकारने आधार योजनेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांनाही रोख मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी संघटनांची बैठक घेतली. त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे सरकारने यासंदर्भात जीआर जाहीर केला आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नवी मुंबई आणि नागपूर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाला ६०,००० रुपये मिळतील.

संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर येथे राहणाऱ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये दिले जातील.

जिल्ह्यात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्यांना ४३ हजार रुपये मिळणार आहेत.

तालुक्यात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना 38 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजनेसाठी पात्रतेनुसार निवड केली जाईल.

 

👉👉 हे ही बघा : पोस्ट ऑफिसची ही योजना करते तुमचे पैसे दुप्पट, इथे बघा कशी करायची गुंतवणूक👈👈

Leave a Comment