सेंट्रल बँकेत निघाली तीन हजार पदांसाठी मोठी भरती, आजच करा इथे ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी आनंदाची माहिती व बातमी आलेली आहे. बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत आहात. मग तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने 3,000 शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. शिकाऊ पदासाठी अर्ज करताना, तुम्ही राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) nats.education.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेतून पदवीधर असले पाहिजेत. याव्यतिरिक्त, उमेदवाराचा जन्म 11 एप्रिल 1996 पूर्वी किंवा 31 मार्च 2004 नंतर झालेला नसावा. अर्ज करण्यासाठी, उमेदवार NATS वेबसाइटला भेट देऊ शकतात. कृपया लक्षात घ्या की तुम्ही फक्त ऑनलाइन अर्ज करू शकता.

3,000 जागांसाठी ही भरती केली जात आहे. त्यामुळे या उमेदवारांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असेल. अर्जाची तारीख 21 फेब्रुवारी 2024 ते 6 मार्च 2024 पर्यंत असेल.

अर्ज करताना ठराविक रक्कम भरावी लागेल. रक्कम भरल्यानंतरच तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल. अर्जाची फी सर्वसाधारण, ओबीसी श्रेणीसाठी 800 रुपये, एससी, एसटी ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 600 रुपये आणि पीएच उमेदवारांसाठी 400 रुपये आणि सर्व उमेदवारांसाठी 600 रुपये आहे.

 

👉👉 हे ही बघा : रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी .! रेल्वे विभागात निघाली या पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

Leave a Comment