आता शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार, काय आहे योजना,नोंदणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने अर्ज असा करावा.

योजनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या पात्र SMF ने जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्यावी, किंवा आपल्या स्मार्टफोनवरून संबंधित योजनेच्या संकेतस्थळाला भेट द्या.PM Kisan Maandhan Yojana.

 

 👉👉प्रधानमंत्री किसान मानधन योजना अधिकृत वेबसाईट👈👈

 

नावनोंदणी प्रक्रियेसाठी खालील अटी आहेत:

आधार कार्ड

IFSC कोडसह बचत बँक खाते क्रमांक (बँक खात्याचा पुरावा म्हणून बँक पासबुक किंवा चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटची प्रत).

शेतकऱ्याचा उत्पन्नाचा दाखला

ग्रामस्तरीय उद्योजकाला (VLE) प्रारंभिक योगदानाची रक्कम रोख स्वरूपात दिली जाईल.

अर्ज प्रक्रिया सुरू असताना आधार कार्ड नंबर टाकल्याचा पर्याय असतो. त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर अर्जदाराचे नाव जन्मतारीख याची तपासणी होते.

बँक खाते तपशील, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता, जोडीदार (असल्यास) आणि नॉमिनीचे तपशील यांसारखे तपशील भरून ऑनलाइन नोंदणी पूर्ण करेल.

त्यानंतर लाभार्थीच्या वयानुसार देय मासिक योगदानाची स्वयंचलित गणना करेल. त्यानंतर त्या शेतकऱ्याला मासिक हफ्ता ठरवला जाईल.PM Kisan Maandhan Yojana.

या अर्जामध्ये सांगितलेली लाभार्थ्याची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर भरलेल्या अर्जाची पूर्ण तपासणी करून त्याची प्रिंट काढण्याचा पर्याय असतो. तिथून शेतकऱ्यांना प्रिंट काढता येते. म्हणजे जेव्हा काही समस्या ते असेल त्यावेळी त्या प्रिंटची गरज भासेल.PM Kisan Maandhan Yojana.

 

📌 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती नफा मिळेल?

किसान निवृत्तीवेतन योजनेतील नियमांनुसार, जर एखादा शेतकरी (ज्याची 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन शेती आहे) 18 वर्षे वयाचा असेल तर, त्याला दरमहा 55 किंवा वर्षाकाठी 660 रुपये जमा करावे लागतील. यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर त्याला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल. सरकारने सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली रक्कम दरमहा आणि वार्षिक जमा करावी. म्हणजेच, जर आपण 25 वर्षांचे असाल तर, आपल्याला या योजनेंतर्गत किती पैसे जमा करावे लागतील, याबद्दल योजनेत माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे आपण या योजनेत जेवढे पैसे जमा कराल, तितकेच सरकारही जमा करेल.PM Kisan Maandhan Yojana

 मध्येच योजना सोडून दिल्यास किंवा लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास पैशांचे काय होईल?

जर लाभार्थी योजना मध्येच सोडली किंवा पैसे जमा करणे थांबवले तर, तोपर्यंत जमा केलेले पैसे सुरक्षित असतील. जमा केलेल्या रकमेवर, बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकी रक्कम व्याज म्हणून मिळेल. जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू वैगेर झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के पैसे मिळत राहतील.

पंतप्रधान किसान पेन्शनसाठी कोण पात्र नाही

खालील श्रेणींमध्ये येणारे सदस्य पात्र नाहीत?

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजना, कर्मचारी निधी संस्था योजना इ. यासारख्या इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत समाविष्ट असलेले शेतकरी यासाठी पात्र राहणार नाहीत.

ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित व्यापारी आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना निवडली आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.