आता शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार, काय आहे योजना,नोंदणी कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रहो केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई योजना तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकार नवीन योजना राबवत असते.अशातच सरकारने एक योजना जाहीर केली आहे. ती म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना PM Kisan Maandhan Yojana.

तर आजच्या या भागामध्ये आपण याच योजनेसंबंधी PM Kisan Maandhan Yojana. संपूर्ण माहिती घेणार आहोत. तरी हे संपूर्ण माहिती एकदा नक्कीच वाचा आणि माहिती आवडल्यास आपले मित्र आणि नातेवाईक यांच्यापर्यंत जरूर शेअर करा.

 

👉 हे ही वाचा : आता तपासा Whatsapp वर रेल्वेचे PRN स्टेटस; असे तपासा स्टेटस इथे बघा संपूर्ण माहिती👈

 

PM Kisan Maandhan Yojana : प्रधानमंत्री किसान मानधन योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान मानधन योजना PM Kisan Maandhan Yojana ही वृद्धांचे संरक्षण करण्यासाठी आणि लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना (SMF) सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार केलेली सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभांसाठी 18 ते 40 वयोगटातील आणि 01.08.2019 पर्यंत राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदींमध्ये 2 हेक्‍टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले सर्व छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत.

या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर, या योजनेत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना रु.3000 प्रति महिना किमान हमी पेन्शन मिळेल. जर निवृत्ती आधीच जर एखाद्या शेतकऱ्याचे निधन झाले, तर त्याच्या जोडीदाराला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून 50% पेन्शन मिळण्याचा हक्क सरकारने दिला आहे. या कौटुंबिक पेन्शनसाठी फक्त जोडीदार पात्र आहे.PM Kisan Maandhan Yojana.

PM Kisan Maandhan Yojana. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी यासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रीमियम म्हणून दरमहा काही पैसे द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या वयानुसार ही रक्कम निश्चित केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात.

 

👉 अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment