मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णय.! लग्न करणाऱ्या जोडप्यांना देणार सरकार 25 हजार रुपये, इथे जाणून अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महिला व बालविकास विभागासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता अनुदान म्हणून २५ हजार रुपये दिले जातील.

झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचे अनुदान 25 हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या, मंगळसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी सामूहिक विवाह करणाऱ्या किंवा नोंदणी करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला 10,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2000 रुपयांचे अनुदान दिले जाते. आता जोडप्यांना 25,000 रुपये आणि संस्थांना 2,500 रुपये अतिरिक्त अनुदान मिळेल. हे अनुदान DBT पद्धतीने थेट खात्यात जमा केले जाईल.

महिला व बालविकास विभागाच्या आजच्या निर्णयानुसार आदिवासी विकास, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आदी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेतील अनुदानातही वाढ करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक विभागांनी सदर प्रस्ताव मंत्रिपरिषदेच्या बैठकीपूर्वी पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

 

👉👉 हे ही बघा : आधारकार्ड धारकांसाठी आली खुशखबर.! आता या तारखेपर्यंत करता येणार आधार मोफत अपडेट👈👈

Leave a Comment